नाशिक (दिनकर गायकवाड) नाशिक रोड येथील रेल्वेट्रॅक्शन एकलरारोड येथे रस्त्यातील सुरू असलेल्या खड्ड्यांमुळे पत्रकार निलेश छाजेड यांच्या अपघाताचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली.
निलेश छाजेड यांचा नुकताच रात्री ९ वाजेच्या घरी येत असताना रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला.संबंधित विभागावर अपघातास कारणीभूत ठरल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिक मराठी पत्रकार संघ,जैन समाज बांधव, आणि एकलहरा ग्रामस्थ यांनी निवेदन द्वारे केले.त्याप्रसंगी पत्रकार सुनील पवार, हरीश बोराडे, संतोष भावसार, योगेश मानकर, मनोज मालपाणी, विनोद बेडरकर, अंबादास शिंदे, यांच्यासह सुखदेव बोराडे, संदीप भवर, शांताराम कापसे, सुरेखा पगारे आदी उपस्थित होते.
