कौतुक आणि अभिनंदन भीम कन्या ऋतुजा आहिरे
संगमनेरची भीम कन्या ऋतुजा अहिरे एक १९ वर्षाची मुलगी महापुरुषांच्या विचार धारेने प्रभावित झालेली फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तिने आपल्या कर्तुत्वाने सिद्ध केले आहे की ती एक खरोखरच भीम कन्या आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर
त्यांच्या आईने सरकारी दहा लाखाची मदत नाकारली. त्यावेळी तिने स्वतः एक ग्रुप स्थापन करून त्या मातेला एक लाखाहून जास्त मदत केली. स्वतः घरी कुटुंबातली असून देखील तिला माणुसकीची जाण आहे. आणि जणू काय माणूसकी हाच तिचा प्राण आहे. या उदात्त हेतूने प्रेरित झालेले एक व्यक्तिमत्व आहे.
तिच्या कामाची दखल घेऊन तिला मार्च महिन्यामध्ये दादर ठिकाणी आणि चेंबूर ठिकाणी तिचा सन्मान करण्यात आला.
ज्यावेळी डॉ. रवींद्र जाधव डॉ. सुरेखा जाधव यांच्या अनाथ आश्रमासाठी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी देखील तिने व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्या ग्रुपच्या माध्यमातून तो कार्यक्रम यशस्वी करून दाखवला.
त्या कार्यक्रमांमध्ये तिचा सर्वात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे तिला त्या कार्यक्रमाच्या वेळी आदर्श भीम कन्या पुरस्कार देण्यात आला आणि तिची संविधान सैनिक महिला ब्रिगेड कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अगदी कमी वयामध्ये आपल्या आयुष्यात प्रचंड मेहनत करून आपलं काम करणे, व जे अशक्य असेल ते शक्य करणे. हे तिचे कौशल्य आहे.आणि तिच्या आणि तिच्या केलेल्या कामाचं कौतुक म्हणून डॉ. रवींद्र जाधव यांनी तिची संविधान सैनिक महिला ब्रिगेड कार्याध्यक्षपदी निवड केली.
सतत कार्यरत राहून समाज उपयोगी कामे करणे हाच तिचा महत्त्वाचा गुण आहे. तरी अशा या भिमकन्या ऋतुजा ला खूप खूप शुभेच्छा. आणि आपली निवड ती सार्थ करील
यात कोणती शंका नाही.
लेखक-संजय पवार
-खंडोत्री
