बेथेल चर्च मिनिस्ट्री मध्ये झावळ्याचा रविवार
श्रीरामपूर (दीपक कदम) येथील बेथेल चर्च मिनिस्ट्री या ठिकाणी मोठ्या भाव भक्तीने झावळ्याचा रविवार झावळ्या घेऊन मोठ्या भाव भक्तीने साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी रेव्ह.पा.सतीश अल्हाट यांनी झावळ्याचा रविवार यानिमित्ताने शुभ संदेश सांगितले की,प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी राजाचा राजा असताना देखील लिन,नम्र झाला.झावळ्याचा रविवार म्हणजे खजुराचा रविवार, विजयाचा रविवार,प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याचा शेवटचा आठवडा म्हणून साजरा केला जातो.आणि प्रभू ख्रिस्ताने सांगितलेली भविष्यवाणी पूर्ण होते म्हणून झावळ्याचा रविवार हा प्रशु ख्रिस्ताचा जयजयकाराचा दिवस म्हणजे होसान्नाचा दिवस साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करतांना प्रसंगी सिस्टर नलिनी अल्हाट,पास्टर राजेश प्रभुणे ब्र.निलेश जाधव, ब्र. सचिन वाघ, ब्र.सोमनाथ ब्राह्मणे, ब्र.अरुण थोरात, ब्र. जैतून अल्हाट, ब्र.अमित पठारे . क्षारण आल्हाट,.नंदा जाधव. सुनिता क्षीरसागर योगिता शिरसागर .पूजा सोनवणे, इत्यादी उपस्थित होते.
