पहलगाम बैसरण येथील निष्पाप ‌दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रवादी तर्फे मंत्रालयात निषेध

Cityline Media
0
जम्मू-कश्मीरमधील पहलगामच्या बैसरण व्हॅलीमध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे यांच्यासह पक्षाच्या मंत्री  आणि आमदारांनी दंडाला काळया फिती बांधून मंत्रालय शेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या घटनेचा निषेध नोंदविला आणि शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि एकतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच एकजुटीने उभा राहील.

यावेळी हसन मुश्रीफ,  नरहरी झिरवाळ.मकरंद पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,  कु.आदिती तटकरे, श इंद्रनील नाईक, प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष. शिवाजी गर्जे, महिला प्रदेशाध्यक्ष  सौ.रुपाली चाकणकर,  इद्रिस नायकवाडी,. पंकज भुजबळ. अनिल पाटील, सुनील शेळके,लहू कानडे, मुख्य प्रवक्ते  आनंद परांजपे, प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस सौ. राजलक्ष्मी भोसले, प्रदेश सरचिटणीस.लतिफ तांबोळी, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष. महेंद्र पानसरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!