नागपूर एमआयडीसीच्या कंपनीत झालेल्या स्फोटात चौघांचा मृत्यू, १५० कामगार वाचले

Cityline Media
0

नागपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क 

नागपूरमधील उमरेड एमआयडीसी मधील एम.एम.पी. इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत स्फोट झाला.या स्फोटात चौघांचा मृत्यू झाला, तर एकाचा शोध अद्याप घेतला जात आहे.या स्फोटामध्ये ११ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. १५० कामगार काम करत असताना स्फोट झाला.
काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास स्फोट होऊन लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरूच आहे. यामध्ये ११ कामगार गंभीर जखमी झाले गेले त्यांच्यावर नागपूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि पोलिस
अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी पाहणी केली. एम.एम.पी. ही ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे. ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो.या कंपनीत एकूण १५० कामगार आहेत. सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे १५० कामगार कामावर होते.

स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला.दरम्यान कामगार आपला जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले. पण काही जण अडकले. जखमींवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला आहे. स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कं पनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!