मला बाबासाहेब व्हायचंय ....
माझे आजोबा ज्यांना बाबा म्हणतात ...
माझे बाबा ज्यांना बाबा म्हणतात ....
अन मी हि ज्यांना बाबा म्हणतो ....
आणि माझं होणारं मुल (मुलगा मुलगी कोणीही )
सुद्धा ज्यांना बाबा म्हणेल ...
असं चार पिढ्यांचं बाबांचं नातं असणारे बाबासाहेब ....
मला त्यांच्याप्रमाणे बाबासाहेब व्हायचंय ...
मला बाबासाहेब व्हायचंय ....
आजोबा मला रामजी बाबा सांगतात ...
बाबा मला बाबासाहेब ...
मामा वाचतो भैय्यासाहेब....
काका वाचतात बाळासाहेब ....
अजून मी खुप लहान आह़े ...
मोठमोठ्या गोष्टी ऐकण्यान महान आह़े ...
मला हवं तेवढं उमगत नाही ...
मला हवं तेव्हढं समजत नाही ...
तरीही मला बाबासाहेब व्हायचंय ....
आजी जात्यावर बाबांची ओवी दळते...
आत्या तिच्यासोबत सुर जुळवते ....
ताई न छकुली पीठावर रेषा उमटवते ...
आई संध्याकाळी बाबांची अंगाई गाते ...
मी थोडं थोडं ऐकत जातो ...
थोडा थोडा समजत जातो ...
थोडा थोडा उमजत जातो ...
अजून पुर्ण अर्थ कळत नाहीय...
तरीही मला बाबासाहेब व्हायचंय ....
माझे आजोबा शाळा शिकले नव्हते ...
माझे बाबा शासकीय शाळेत शिकले ...
मी इंटरनॅशनल शाळेत शिकतो ...
जगाची भाषा जुनियर के जी त बोलतो ...
ए फॉर आंबेडकर ...
बी फॉर बाबासाहेब ...
सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज ...
डी फॉर ....
ए टू झेड ....इंग्रजीत बोलतो ...
बाबासाहेबांचं भाषण ऐकतो...
त्यांचं प्रत्येक बोलणं समजून घेतो ...
त्यांचा प्रत्येक शब्द उमजून घेतो ...
हवं तेव्हढं ग्रहण करू शकत नाही ...
तरीही मला बाबासाहेब व्हायचंय ...
पिढी दरपिढी वाढत चाललीय जिज्ञासा ...
आजोबा बाबा मामा काका दादा मावसा ...
नात्यांची वीण घट्ट होतेय समाजाला दिलासा ...
माझ्यासह अनेक बालकं दररोज घेतायत उसासा ...
आम्हां सर्वाना हवाय बाबासाहेबांनी ...
घातलेला सूट बूट टाय अन कोट ...
बाबांच्या पेहरावात आमचाच दिसेल वट...
आम्ही सगळेच होऊ पाहतोय उद्याचे बाबासाहेब ....
प्रत्येक घरात निर्माण व्हावेत उद्याचे बाबासाहेब ....
प्रत्येकाच्या मनात चेतावी प्रेरणा बनण्याची बाबासाहेब ...
प्रत्येक शाळा बनावी मिलिंद अन लेखणी बाबासाहेब ...
आम्ही सारे बाबासाहेब ....
आम्ही सारे बाबासाहेब ....
आम्ही सारे बाबासाहेब ....
मला बाबासाहेब व्हायचंय ...
मला बाबासाहेब व्हायचंय ....
मला बाबासाहेब व्हायचंय ....
आनंद दिवाकर चक्रनारायण
छाया- वैशाली ढवळे
