जम्मू सिटीलाईन मिडिया नेटवर्क
जम्मू कश्मीर मधील किश्तवाड
जिल्ह्यातील छात्रू भागात सुरक्षा दलांना मोठं यश मिळाले आहे. सर्च अँड डिस्ट्रॉय ऑपरेशन दरम्यान आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह ३ दहशतवाद्यांचा खात्मा जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील छात्रू भागात सुरक्षा दलाच्या सर्च अँड डिस्ट्रॉय ऑपरेशनदरम्यान आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.हे ऑपरेशन सुरू होते.शुक्रवारी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. त्यानंतर आता सुरक्षा दलांनी आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे समोर आले 'आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर सैफुल्लाह होता.सध्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू आहे. ९ एप्रिलपासून किश्तवाडच्या छात्रू जंगलात शोध मोहीम राबवण्यात येत होती. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यानंतर,सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफ जवानांसह पॅरा कमांडो इतर दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
