देवळाली प्रवरा येथे चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच रात्री फोडले चार दुकाने

Cityline Media
0
राहुरी (प्नतिनिधी) बुधवारी २३ एप्रिल रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देवळाली प्रवरा येथील दोन किराणा दुकाने व एका हार्डवेअर दुकानाचे मागील बाजूच्या असणारा पत्रा कापून चोरी केल्याची घटना घडली त्यामुळे देवळालीत घबराट पसरली आहे.

रोख रकमेसह अंदाजे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहुरी फॅक्टरी - श्रीरामपूर रस्ता लगतचे 
राजेंद्र उंडे यांच्या ओमसाई किराणा अँड जनरल स्टोअर दुकानाच्या मागील बाजूला असलेला पत्रा कापून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु तो फसला यानंतर काही अंतरावर असलेल्या अवधूत किराणा स्टोअर या दुकानाचा मागील बाजूस पत्रा कापून आत गोडाऊन मध्ये प्रवेश केला व तेथील रोकड रक्कम पळविण्यात आली चोरट्याने ओळखू येऊ नाही म्हणून डोक्यात बॉक्स घातल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा खुरुद पाटील ॲग्रो ट्रेडर्स यांच्या दुकानाकडे वळविला व यांच्याही दुकानाचे पाठीमागील बाजूस असलेला पत्रा तोडून त्यांनी आत प्रवेश करत गल्ल्यातील रोकड लंपास केली यामुळे व्यापारी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!