यात्रेनिमित्त आज साय ठीक नऊ वाजता सुनील कुमार संभाजीनगर कर सह चंदाराणी संभाजीनगर कर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ तमाशाच्या हजेरी तसेच सायंकाळी चार वाजता जंगी कुस्ती हंगामा व सात वाजता मानाच्या काठीची भव्य मिरवणूक गड ते खळी गावापर्यंत चौका चौकातून मिरवणूक निघणार आहे
यात्रेनिमित्त खळी गावासह पंचक्रोशीतील शेजारील गावची खंडोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तसेच खळी गावातील नोकरीनिमित्त बाहेरगावी मुंबई पुणे नगर नाशिक अन्य ठिकाणी असणारे भक्त मंडळ मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होत असतात व यात्रेचा आनंद लुटतात या यात्रेमध्ये तळी भंडार नैवेद्य देवाला दाखविणे याकरिता भक्त मंडळांची खूप गर्दी होते
या यात्रेसाठी भक्त मंडळांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव स्वीकृत विश्वस्त भक्त मंडळाने केले आहे.
