शाहीर मधुकर भालेराव यांची भीम गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून मानवंदना
संगमनेर नितीनचंद्र भालेराव
संगमनेर तालुक्यातील कौठे धांदरफळ येथे भारतीय घटनेचे निर्माते,बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीम शाहीर मधुकर भालेराव यांच्या सुरेल भीम गीतांच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
लोककलावंत शाहीर मधुकर भालेराव यांनी बाबासाहेबांना आपल्या सुमधुर वाणीतून मानवंदना दिले.त्याप्रसंगी संगमनेर कृषी बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग घुले,पुरवठा निरीक्षक संदीप निळे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
शाहिर मधुकर भालेराव यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम झाल्यानंतर बौद्धाचार्य गौतम भालेराव यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना पार पडली.महापुरुषांच्या विचाराचा अभ्यासक सचिन भीमराज घुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार व त्यांनी बहुजन समाज महिला शेतकरी मागासवर्गीय घटकांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.त्यानंतर पंचशील मित्र मंडळाच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास सर्व धर्मीय समाज बांधव,बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी पंचशील तरुण मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रयत्न केला.
