गुडफ्रायडे( उत्तम शुक्रवार) निमित्ताने..
श्रीरामपूर दिपक कदम येथील लोयोला सदन चर्च श्रीरामपूर व सेंट झेविअर चर्च टिळकनगर या ठिकाणी पवित्र क्रुसाची वाट भक्तीमय व दुःखमय अंतकरणाने पार पडली.
यामध्ये लोयोला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे.फादर प्रकाश भालेराव,फा.विक्रम शिनगारे,फा.विजय चोखर, फा.अनिल चक्रनारायण तर सेंट झेवियर चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.पिटर डिसोझा,फार.संजय पठारे यासह कमलाकर पंडीत,विजय त्रिभुवन ,राजु साळवे ,जेम्स पंडीत,रविंद्र लोंढे,रणजित लोंखडे,लता गायकवाड ,शोभा त्रिभुवन, प्रतिमा पंडीत,राजेंद्र भोसले,पी.एस.निकम, प्रकाश निकाळे,लेविन भोसले,रवि आण्णा गायकवाड,अजय लोंढे, अक्षय ठुबे ,सुरेश ठुबे, सुरज पवार ,बबलू लोंढे, दिपक कदम,लाजरस गायकवाड ,भाऊसाहेब तोरणे तसेच संत लुक हॉस्पीटल येथील सिस्टर्स,कनोसा होस्टेलच्या सर्व सिस्टर्स, महिला मंडळ यासह असंख्य भाविकांनी सहभागी झाले होते.पवित्र क्रुसाची वाट झाल्यानंतर खिचडी व केळी वाटप करण्यात आले. नंतर सात शब्दावर प्रवचन देण्यात आले.
