शिर्डी दिपक कदम सोमवार दि.२१ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रवरानगर येथील कालव्यात नेहरू पुलाजवळ पोहण्यासाठी गेलेला प्रवरानगर येथील सुनील रमाजी साळवे, वय वर्ष ५५ हा इसम वाहून गेल्याची घटना घडली आहे.स्थानिक नागरिकांच्या मदतीने सायंकाळी सात वाजेपर्यंत लोणी पोलिसांनी सुनील साळवे यांचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नाही.
सुनील साळवे हे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कालव्यात पोहण्यासाठी गेले असता.ज्या वेळेस त्यांनी पाण्यात उडी मारली. त्यानंतर वर आलेच नसल्याचे प्रत्यक्ष दर्शन कडून सांगण्यात येत आहे
त्यानंतर सकाळपासून शिर्डी नगरपरिषद, राहता नगरपरिषद, श्रीरामपूर नगर परिषद येथील अग्निशमन दलाकडून देखील शोधमोहीम चालू झाली
कालव्याच्या कडेने जात सुमारे दहा किलोमीटर परिसरात शोध घेतला. मात्र ते आढळून आले नाही.दुपारपर्यंत शोध मोहीम हे चालूच होती.
