शिर्डी दिपक कदम राहाता तालुक्यातील तिसगाव फाटा या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता या आधी देखील येथे अपघाताच्या घटना घडल्या होत्या.रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर नसल्यामुळे आणि सिग्नल चालू नसल्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.नागरिकांकडून रिफ्लेक्टर बसवावे आणि बंद असलेले सिग्नल चालू करावे.अशी मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती,नुकतेच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या सुचनेनुसार येथे रिफ्लेक्टर बसवुन बंद पडलेला सिग्नल पुर्ववत करण्यात आल्याने प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे.
रिप्लेटर व दोन्ही बाजूंनी नाईटचे दिवे बसावे अशी मागणी तिसगाव ग्रामस्थांच्या वतीने राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली होती.पालकमंत्र्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित विभागांना सूचना केल्यानंतर लगेच नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० या महामार्गावरील प्रवरानगर - तिसगांव फाट्यावर रिफ्लेक्टर बसवण्यात आले तसेच बंद असलेले सिग्नल देखील चालू करण्यात आले असल्याने ग्रामस्थांसह अनेक वाहतूक प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होताना दिसुन येत आहे.
