नाशिक (दिनकर गायकवाड)
येथील महावितरणच्या परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.
यावेळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा
फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या समारंभा प्रसंगी नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर,सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, हेमंत भामरे कार्यकारी अभियंता योगेश निकम, नीलेश चालिकवार,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले सहाय्यक विधी अधिकारी रणजिस्त बोम्मी, जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
