झरेकाठी (सोमनाथ डोळे)
राहूरी तालुक्यातील निभेंरे येथे महादेव काशी विश्वेश्वर,श्री साईबाबा,श्री बागेश्वर बालाजी (बजरंग बली) प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी कार्यक्रम प्रसंगी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले की मंदीरांच्या रस्त्यासाठी भरीव असा निधी लवकरच उपलब्ध करून देऊ.
प्रसंगी निंभेरे गावातून कलश मिरवणूक काढण्यात आली होती तीन दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये हा.भ. प. सद्गुरू आचार्य संदिप महाराज यांच्या हस्ते धर्म ध्वजाचे अनावरण करण्यात आले.पहिला दिवस -ह. भ. प. एकनाथ महाराज सांगोलकर यांचे कीर्तन झाले.
दुसरा दिवस -नरेंद्र महाराज गुरव यांचे किर्तन पार पडले
काल्याचे किर्तन _उद्धव महाराज. मंडलिक यांचे किर्तनाने झाले प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण प्रसंगी मार्गदर्शक भागवताचार्य सुनील महाराज सोनवणे, ह भ प मनोहर महाराज सिनारे , आकाश महाराज हारदे
कार्यक्रमाचे आयोजक डॉ. अशोक साबळे ,पंढरीनाथ तांदळे आमदार शिवाजी कर्डिले , पोलिस निरिक्षक संजय ठेंगे राहुरी,शिवशाहीर विजय तनपुरे ,सभापती विश्वास कोहकडे ,राहुल गवारे ,निर्मला नवले कारेगाव सरपंच,सुनिल ओस्तबाल, युवा उद्योजक बलराज डुकरे, सरपंच शांताराम सिनारे, अमोल ढेपे, यमुना आघाव, जिल्हा बँकेचे संचालक दादासाहेब वाणी, आकाश महाराज सिनारे ,शाखाधिकारी अमोल हारदे, राजेंद्र साबळे, किशोर साबळे,ज्ञानदेव साबळे, पत्रकार सोमनाथ डोळे,भारत गीते,समस्त ग्रामस्थ निंभेरे ,तुळापूर ,कारेगाव शिरूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार आयोजक डॉ अशोक साबळे यांनी मानले कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
