नाशिक (दिनकर गायकवाड) इशरे अर्थात इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग व एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स,या संस्थेच्या नाशिक शाखेच्या कार्यकारी मंडळाचा शपथग्रहण समारंभ नुकताच पार पडला
गोविंदनगर येथील हॉटेल फोर पॉईंट्स बाय शेरेटन येथे नूतन अध्यक्ष वरुण तिवारी,सचिव अनिकेत चौधरी व सर्व सहकाऱ्यांनी पदग्रहण केले. मावळते अध्यक्ष अश्फाक कागदी यांनी नूतन कार्यकारिणीकडे सूत्रे सुपूर्द केली.यंदा नाशिक शाखेला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नृत्याद्वारे गणेशवंदना सादर करण्यात आली.शपथग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इशरे संस्थेचे
विभागीय संचालक एजाज काझी,जीएसटी सहआयुक्त चेतनसिंह राजपूत उपस्थित होते.
त्यांनी मार्गदर्शन करताना संघटनेचे महत्त्व विशद करून समाजाच्या गरजा वाढत आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे कौशल्यपूर्ण सेवा देण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
पुढील वर्षी मार्चमध्ये मुंबईत होणाऱ्या २५ व्या भव्य प्रदर्शनात नाशिककर सभासदांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. अध्यक्ष वरुण तिवारी यांनी आगामी योजना सांगून वर्षभरातील उपक्रमात सर्वांचे संपूर्ण सहकार्य मिळेल,असा विश्वास व्यक्त केला.यावेळी कॅलेंडरचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या समारंभाला पुण्याचे वीरेंद्र बोराडे,आगामी अध्यक्ष मंगेश सोनवणे,खजिनदार अभिषेक पहाडी, कार्यकारिणी सदस्य अनिता बोराडे,सतीश सूर्यवंशी, प्रसाद वाणी, सारंग दीडमिशे, रोहिणी मराठे आणि के दार रत्नपारखी, राहुल गोवर्धने, फर्नांडिस स्टॅन्ली,मुकुंद होळकर,
वैभव जोशी, अमित सातपुते, संजय निकम, धनंजय पवार, सुरेश दीडमिशे, रऊफ शेख, सचिन सावे आदी मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगीता वाजे व गुलाम हुसेन यांनी केले, तर आभार नूतन सचिव अनिकेत चौधरी यांनी मानले.
