खळी येथे डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त सर्व रोग निदान शिबीर उपक्रम कौतुकास्पद झरेकर
संगमनेर किशोर वाघमारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ जयंती निमित्त खळी येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संयोजन समितीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये सकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉस्पिटल मेडिकल हॉस्पिटल संगमनेर यांच्या विद्यमाने सर्व रोगनिदान शिबिर नऊ ते एक आयोजित केले होते.सायंकाळी पाच वाजता पारंपारिक वाद्यांच्या साहाय्याने भव्य मिरवणूक मिरवणुकीचे आकर्षण लाठीकाठी खेळ रात्री नऊ वाजता अभिवादन सभा या सभेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक अरुण ब्राह्मणे यांचे व्याख्यान झाले.
यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार पाच व्यक्तींना प्रदान करण्यात आले त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा इयत्ता पहिली ते दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा जयंती समितीच्या वतीने भारतीय संविधान व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला
यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व रोग निदान शिबिरामध्ये रुग्ण व भीमसैनिकांना मार्गदर्शन करताना आश्वी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पर्यवेक्षक श्री झरेकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या केंद्र सरकारच्या समाजातील गरीब
घटकासाठी गरीब माणसासाठी अनेक योजना अवलंबित असून आजच्या धावपळीच्या युगामध्ये गावातील परिसरातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या शरीराची योग्य ती तपासणी करून घेणे गरजेचे आहे कारण दैनंदिन जीवनामध्ये दररोज नवनवीन आजार ऐकण्यास मिळत असून
आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या आजारामध्ये वाढ होते व अटॅक सारख्या आजारामध्ये अनेक रुग्णांना आपला प्राण गमावू लागलेला आहे त्यामुळे दर तीन महिने आपण जर आपल्या शरीराची तपासणी केली तर आपल्या शरीरामध्ये कुठला आजार आहे का?
आपल्या शरीराला कुठले घटक कमी पडतात का? याची डॉक्टर तपासणी नुसार आपल्याला माहिती दिली जाईल व त्यानुसार आपल्याला औषध उपचार केले जातील आज आपल्या खळीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संयोजन समितीच्या वतीने जे शिबीर आयोजित केले आहे
त्या शिबिराचे या गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घेतला पाहिजे त्याचे कारण असे की आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आश्वी व आपले उपकेंद्र खळी येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन ये शिबिर आयोजित केले आहे व या दोन्ही उपकेंद्राच्या माध्यमातून
दोघांना पाहिजे ती सेवा शासनाची मोफत आहे ती सेवा आपण घेतली पाहिजे असे आवाहन यावेळी दरेकर यांनी उपस्थित रुग्णांना केले असून आपण आपला बीपी टेंपरेचर ईसीजी हृदयाचे ठोके हे वारंवार चेक केले पाहिजे असे आव्हान यावेळी शिबिरात उपस्थित असणाऱ्या रुग्णांना व नागरिकांना करण्यात आले.
जयंती कार्यक्रमासाठी आश्वी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश काकड सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. निकम डॉ.रोकडे उपकेंद्राच्या परिचारिका श्रीमंती महाकाळे गावचे सरपंच विलास गजानन वाघमारे श्रीखंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष
किशोर वाघमारे अनिल वाघमारे प्राध्यापक बाळासाहेब वाघमारे बाळासाहेब भिकाजी वाघमारे दत्तात्रय मधुकर वाघमारे प्रदीप भानुदास वाघमारे सौरभ सदाशिव वाघमारे रमेश दगडू वाघमारे सखाराम दगडू वाघमारे बाबासाहेब सुखदेव वाघमारे भाऊसाहेब सुखदेव
वाघमारे नामदेव लबडे अर्जुन गवळी लक्ष्मण बर्डे भीमराज कातकाडे मयूर चकोर गोरख नागरे मच्छिंद्र नागरे गणेश वाघमारे प्रमोद वाघमारे सोमनाथ सानप सचिन आव्हाड सतीश घुगे आशासेविका सुनीता नागरे सविता सोसे वर्षा घुगे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते खळी गावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून व बुद्ध वंदना घेऊन दिप प्रज्वलित करून डॉ.आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रेवजी नाना सातपुते यांनी केली
