-अकोले पोलिस निरिक्षकांना निवेदन सादर
--आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी अत्याचार विरोधी कृती समिती आक्रमक
-बऱ्हे दांपत्याकडून वेठबिगार प्रमाणे काम
नाशिक (शिवाजी पगारे),अकोले तालुक्यातील रेडे येथील खडी कर्मा याने दबाव तंत्राचा वापर करुन इगतपुरी तालुक्यातील आधारवड येथील दाम्पत्यांचा ट्रॅक्टर हिसकावून घेत व्यावहारिक घोळ घालून त्यांना वेठबिगार समजत अर्वाच्च भाषेत जातीयवादी शिवीगाळ केल्याने नाशिक येथील अत्याचार विरोधी कृती समिती आक्रमक झाली असून समितीच्या वतीने अकोले पोलिस निरीक्षकांना कारवाईच्या मागणीचे निवेदन नुकतेच देण्यात आले आहे,आरोपीवर त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील आधारवड येथील.खंडू बऱ्हे,हे खडीक्रेशर व मजूरीचे काम करतात व्यवसायासाठी लागणारा त्यांचा सुस्थितीत असणारा चालू ट्रॅक्टर व ट्राॅली ही अकोले तालुक्यातील रेडे येथील आरोपी रूकेश नवले याने बळजबरीने हिसकावून, चोरीच्या इराद्याने त्याच्या ताब्यात ठेवलेला आहे.
तसेच आरोपी रुकेश नवले याने तक्रारदार खंडू बऱ्हे यांना दमदाटी करून (नोटरी करारनामा) बनावट रित्या केलेला आहे,करार नाम्यात उसनवारी उचल म्हणून घेतलेली रक्कम अडीच लाख इतकी लिहिलेली असून तक्रारदाराने इतकी रक्कम आरोपी कडून घेतली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपी रुकेश नवले याने तक्रारदार खंडू बऱ्हे यांच्या पत्नीची जात माहिती असल्याने आरोपीने तिला जातीवाचक शिवीगाळ केली तसेच स्त्री जातीचा अपमान होईल,लज्जा उत्पन्न होईल अशी गुन्हेगारी स्वरुपाची वर्तणूक केलेली आहे. आरोपी रुकेश नवले हा बऱ्हे पती-पत्नीकडून दररोज १८ तास पेक्षा अधिक तास एवढे वेठबिगार प्रमाणे काम करवून घेतलेले आहे,तसेच या अधिकच्या कामाचा मोबदला त्यांना न देता उलटपक्षी आरोपीने दांपत्याला याप्रकरणी कुठे तक्रार अथवा वाच्यता केल्यास जीवे मारुन ठार करण्याची धमकी देखील दिलेली आहे.
सदरची घटना गंभीर असल्याने आरोपीच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे तसेच अनु.जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (ॲट्रोसिटी कायद्यानुसार) गुन्हयाची नोंद होऊन अटक करावी व कठोर शासन करावे.तक्रारदाराचा सुस्थितीत असणारा ट्रॅक्टर व ट्राॅली तात्काळ तक्रारदाराच्या ताब्यात मिळावे;अन्यथा समितीचे वतीने आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे अकोले पोलिसांना समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी समितीचे अत्याचार विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक ॲड.राहुल विष्णू तूपलोंढे सामाजिक कार्यकर्ते ,शिवाजी बी.पगारे रोहिणी सुरेश जाधव वर्षा बऱ्हे,खंडू बऱ्हे,आदि उपस्थित होते.निवेदनावर उपस्थितांच्या सह्या आहेत.