रिकव्हरीचा विषय संपवत पर्सनल करणाऱ्या नाशिकच्या फायनान्स वसुली अधिकाऱ्याची अर्वाच्य आणि अश्लील शिवीगाळ

Cityline Media
0
इंदिरानगर पोलिसांनी जाणीवपूर्वक दखलपात्र गुन्हा टाळला

नाशिक दिनकर गायकवाड येथील एका फायनान्स अधिकाऱ्यांने शहरातील इंदिरानगर येथील एका व्यावसायिक ग्राहकाला अश्लील आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.वसुली करता,करता हा रिकव्हरीचा विषय संपवत त्याने फोनवरून ग्राहकाला,महिलांना अपशब्द वापरल्यामुळे या प्रकाराने फायनान्स कंपनीने व्यावसायातील ‌धिंदवडे निघाले आहे फायनान्स कंपनीचे मार्केट मधील नाव खराब झाले आहे.
सदर ग्राहकाने इंदिरानगर येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याऐवजी चिरीमिरीच्या अपेक्षेपायी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे 

सविस्तर वृत्त असे की शरयुनगर येथील रोहित विकास गवारे (वय३०) यास काही पैसे फायनान्स कंपनीचे देणे बाकी होते परंतु फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी याने फोनवरुनच हमरी तुमरीला सुरुवात केली बोलता, बोलता प्रकरण पुढे वाढत गेले मग मात्र वसुली अधिकाऱ्याने फायनान्स कंपनीचे सर्व नियम मोडीत काढले आणि म्हणाला की कंपनी गेली उडत आता हा विषय आपला वैयक्तिक झाला आहे तु तुझे दुकान आता उघडूनच दाखव असे बोलून अर्वाच्य आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली तर त्यावेळी त्या घरातील महिलांनी फोनवरच मध्यस्थी केली परंतु या फायनान्स अधिकाऱ्यांने ‌त्यांच्या समोरच लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने ग्राहकास शिवीगाळ केली.
 
इंदिरानगर पोलिसांनी आरोपी विरूद्ध पनाका रजि न.६७६/२०२५ भारतीय न्याय संहिता क्र.३५१(४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास करण्यासाठी पोहवा १५३ खरोटे यांना आदेशित केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!