विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन ठरणाऱ्या द परफेक्ट इंग्लिश ग्रामर पुस्तकाचे प्रकाशन

Cityline Media
0
अनिल आढाव यांच्या परिपूर्ण इंग्रजी व्याकरण पुस्तकाचे प्रकाशन

सिटीलाईन न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : सर्व विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन ठरेल असे अनिल आढाव यांनी लिहिलेल्या 'परिपूर्ण इंग्रजी व्याकरण द परफेक्ट इंग्लिश ग्रामर' या पुस्तकाचे नुकतेच शंभूगिरी महाराज यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
प्रसंगी माजी प्राध्यापक उत्तम भगत,प्राचार्य उत्तम खुळे,आदी उपस्थित होते. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी,शिक्षक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.हे पुस्तक द्विभाषिक पुस्तक असून,यामध्ये इंग्रजी व्याकरणाच्या मूलभूत संकल्पना,अद्ययावत नियम,व्याकरणाचे विविध प्रकार आणि भरपूर उदाहरणे समाविष्ट आहेत.विशेष म्हणजे प्रत्येक नियम आणि उदाहरण इंग्रजीसह मराठीत स्पष्टपणे मांडले आहे. त्यामुळे वाचकांना व्याकरण आत्मसात करणे अधिक सुलभ होईल,अशी माहिती पुस्तकाचे लेखक आढाव यांनी दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बर्डे हिने केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!