'रेनवडी'चे माजी अध्यक्ष राजाराम डेरे यांचे निधन
पारनेर (प्नतिनिधी)
तालुक्यातील रेनवडी गावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष,तसेच वारकरी सांप्रदायातील एक जेष्ठ व्यक्तीमत्व राजाराम रावजी डेरे यांचे मंगळवार दि.२५ मार्च रोजी पहाटेच्या दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.रेनवडी गांवचे विद्यमान सरपंच श्रीकांत डेरे यांचे ते वडील होत.
जुन्या पिढीतील एक प्रमाणिक आणि कष्टाळू कार्यकर्ता अशी त्यांची पंचक्रोशीत ओळख होती.संत निळोबाराय पायी दिंडी रेनवडी ते पंढरपूर पर्यत सुरु करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.पुणे पोलिस सेवेत त्यांनी प्रदिर्घ सेवा केली.सेवानिवृत्ती नंतर त्यांनी राजकीय,सामाजिक,शैक्षणिक धार्मिक आणि क्षेत्रामधे त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यांच्यावर रेनलडी वैकुंठ स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,सुना,नातसुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे. त्यांच्या निधनामुळे डेरे परीवारावर दुःखाची छाया पसरली आहे.त्यांच्या निधनाने रेनवडी पंचक्रोशीतीत हळहळ व्यक्त होत आहे.