तपास पथकातील अंमलदारांचा कारनामा
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क तपासाच्या नावाखाली एका सराफ व्यावसायिकाकडून घेतलेल्या २७ तोळ्यांहून अधिक सोन्याचा पोलिस अंमलदारांनी अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यातील चार पोलिस अंमलदारांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
कर्नाटकातील बल्लारी येथे सराफा व्यवसाय करणाऱ्या कपिल मफतलाल जैन यांच्या दुकानात पोलिसांचे पथक तपासासाठी गेले होते.चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या चोरट्याकडे सुवर्णहार गहाण ठेवल्याची पावती होती. सुवर्णहार गहाण ठेवून चोरट्याला ३० हजार रुपये दिल्याची कबुली जैन यांनी
प्राथमिक चौकशीत संबंधित कर्मचारी दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे; तसेच त्यांची विभागीय चौकशी सुरू असून, सराफाकडून त्यांनी सोने घेतले का,त्या सोन्याचे काय केले,या गोष्टी चौकशीनंतर समोर येतील.त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ पाच
पोलिसांना दिली होती. त्यानंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी जैन यांना धमकावले. 'तुझ्याकडे आणखी १०० तोळे सोने असून, ते चोरांकडून घेतले आहे,' अशी धमकी दिली. 'तू ज्यांच्याकडून सोने घेतले आहे. ते चोरटे कोयता गँगमधील असून, त्यांनी पोलिसांवरदेखील हल्ला केला आहे,' असे जैन यांना सांगण्यात आले.
तडजोडीत जैन यांनी तपासासाठी आलेल्या चार पोलिस अंमलदारांना २७ तोळे सोन्याचे दागिने दिले.
दरम्यान, पोलिसांनी तपासासाठी सोने ताब्यात घेतल्याचा दावा केला. मात्र, जैन यांनी स्थानिक पोलिस ठाणे आणि वानवडी पोलिस ठाण्यात चौकशी केली असता, अशा प्रकारचा कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जैन यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वानवडी विभागाच्या सहायक आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी केली. तपासाअंती पोलिस कर्मचाऱ्यांनी विश्वासघात करून चुकीची कृत्ये केल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, चौघा पोलिसांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
