प्रत्येक सैनिकाचे स्वप्न असाते की नोकरीच्या काळात एकदा तरी पाकिस्तानशी लढावे-राजेंद्र दरेकर
आश्वी खुर्द संजय गायकवाड भारत आणि पाकिस्तान मधील संबंध ताणले गेले असुन सीमेवर तणाव निर्माण झाला आहे, भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करायला सुरुवात केली.मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले आहेत सीमेवर वाढलेल्या तणावामुळे सैनिकांच्या सुट्ट्या रद्द झाल्या आणि सर्वांना बोलावूनघे घेण्यात येत आहे महाराष्ट्रातील जवानांमध्ये संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील जवान राजेंद्र दरेकर यांचा समावेश आहे त्यांना आज आपल्या कर्तव्यावर जम्मू येथे रुजू होण्यासाठी माघारी जावे लागले.
प्रसंगी साश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी त्यांचा परिवार गावकरी आतेष्ठ एकटवले होते यावेळी जवान राजेंद्र दरेकर म्हणाले की प्रत्येक सैनिकाचे स्वप्न असते की आपल्या १५ ते २० वर्षाच्या नौकरीच्या काळामध्ये एकदा तरी पाकिस्तानशी समोरा समोर युध्दात सहभागी व्हावे.माझे नशीब आहे की माझी ड्युटी ही श्रीनगर परिसरामध्ये असुन मला लढाण्याची संधी आली आहे असे मत भारतीय सैन्यदलात असलेले राजेंद्र बाळासाहेब दरेकर यांनी व्यक्त करताच उपस्थित लोक भावनिक झाले.
जवान राजेंद्र दरेकर हे आपले कर्तव्य निभावण्यासाठी निघाले असता ग्रामस्थांनी तसेच त्यांच्या परिवारने त्यांना हसत निरोप दिला.यावेळी मा.सरपंच म्हाळु गायकवाड,उपसरपंच बाबा भवर,मा. उपसरपंच संजय गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष कैलास गायकवाड,भारतीय लहुजी सेनेचे राज्य सचिव संतोष भडकवाड, बाबासाहेब भोसले,नाथभक्त विठ्ठल मोरे, मनोज कहार,सुरेश गायकवाड, किरण बिडवे, तलाठी शिवाजी दरेकर,आण्णा शेंडकर, कादर सय्यद, शरद भडकवाड, सचिन बोरुडे पत्रकार वैभव ताजणे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जवान राजेंद्र बाळासाहेब दरेकर हे सन २०११ साली इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये भरती झाले असुन त्यांनी पंजाब,लेह,लद्दाख,आसाम, तामिळनाडु आदी ठिकाणी देशसेवा केली आहे व गेल्या ३ वर्षापासुन जम्मु काश्मीरच्या श्रीनगर येथे कॉन्सटेबल जीडी या पदावर कार्यरत आहे.आठ दिवसापूर्वी ते एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते मात्र पहलगाम येथील २८ पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला करत ठार केल्यानंतर भारतांने कठोर भुमिका घेत चोख प्रत्युत्तर दिले आहे.गेली तिन दिवसांत परिस्थिती गंभीर होत आहे त्यामुळे खबरदारी म्हणून सुट्टीवर असलेल्या सर्व सैनिंकाच्या सुट्टया रद्द करण्यात आल्यानंतर राजेंद्र दरेकर ही दिल्लीला रवाना झाले
ऑपरेशन सिंन्दूर मध्ये सहभागी होणाऱ्या पतीचा मला सार्थ अभिमान
-ऑपरेशन सिंदूरचा भाग होण्यासाठी माझे पती राजेंद्र बाळासाहेब दरेकर यांना संधी मिळाती याबद्दल आनंद आहे.पाकिस्तानी अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्या मध्ये अनेक निष्पाप भारतीयांना मारले त्यांचा बदला भारतीय सैनिक घेत आहे सर्व सैनिकांना माझ्याकडुन विजयासाठी शुभेच्छा.
सौ.कल्याणी राजेंद्र दरेकर,आश्वी खुर्द ता.संगमनेर
युद्धजन्य स्थितीत भारतीयांची एकता गरजेची
-आपल्या देशावर जे मोठे संकट उभे राहिले असुन त्यासाठी प्रत्येक भारतीयानी एकजुट होऊन त्यांच्या विरोधात मुकाबला करणे आवश्यक आहे. माझे विद्यार्थी राजेंद्र दरेकर हा शालेय जिवनापसुन अतिशय चाणाक्ष आणि शिस्त प्रिय होता.नाथ परीवाराचा तो एक सदस्य असुन माझ्या परीवाराकडून तसेच समस्त नाथ भक्ताकडुन त्यांस पुढील विजयी कार्य़ास शुभेच्छा
विठ्ठल मोरे,ओम चैतन्य कानिफनाथ दरबारचे प्रमुख आश्वी खुर्द ता.संगमनेर
