नाशिक दिनकर गायकवाड- तरुणीशी ओळख करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून व तिच्या इच्छेविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची फसवणूक करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही इंदिरानगर परिसरात राहते.आरोपी अभी उर्फ शंकर दळवी (यय ३५, रा केतकीनगर, म्हसरूळ) याने ओळख निर्माण करून तिच्याशी कौटुंबिक संबंध तयार केले. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या इच्छेविरुद्ध राणेनगर येथील हॉटेल, सातपूर व डोंबिवली अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध करून विवाहाचा देखावा केला,
तसेच पीडितेला नांदायला घेऊन न जाता केवळ विवाहाचा बहाणा करून "माझ्या घरच्यांची या लग्नाला संमती नाही," असे सांगून पीडितेची फसवणूक केली. पीडित फिर्यादीचा विवाह दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी झाला असून, फिर्यादी ही तिच्या पतीसोबत सुखाने संसार करीत असताना आरोपी अभी दळवी याने फिर्यादीला व तिच्या पतीला गाडीने उडवून देण्याची धमकी दिली, तसेच फिर्यादीकडे शरीर सुखाची मागणी व पाठलाग करून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार सन २०२० ते दि. २५ मार्च २०२५ यादरम्यान घडला. या दि प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या तरुणाविरुद्ध बलात्काराबा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.