श्रीरामपूर शहरात पाणी टंचाई भासू नये यासाठी भाजप प्रयत्नशील

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम शहराच्या पाणी साठवण तलावात सुरू असलेल्या कामादरम्यान अचानक तलावाला भगदाड पडल्याने तीन दिवसांच्या पाणी साठ्याचा अपव्यय झाला. या प्रकारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली असताना भाजपच्या माजी नगरसेवकांनी साठवण तलावावर जात पाहणी केली.
यावेळी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी पाण्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली.प्रसंगी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे,माजी नगरसेवक रवी पाटील,माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांनी सांगितले की, "शहरात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून आवश्यकता पडल्यास जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांना विनंती करुन पिण्याच्या पाण्याचे अतिरिक्त रोटेशन सोडण्याची व्यवस्था केली जाईल. 

 श्रीरामपूर शहराला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.यावेळी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी शहरातील पाणीपुरवठा नियमितपणे सुरू ठेवण्याबाबत केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.

यावेळी पाणीपुरवठा अधिकारी अरविंद मराठे,बांधकाम विभागाचे अधिकारी सूर्यकांत गवळी, पाणीपुरवठा तंत्रज्ञ नीलेश बकाल,भाजपचे शहर सरचिटणीस रवि पंडित, बाळासाहेब हरदास,विशाल रुपनर,राहुल पांढरे,सागर म्हस्के,कार्तिक मंडवे आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!