पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पायदळी तुडवत श्रीरामपूरात भाजपाने केला जल्लोष

Cityline Media
0

श्रीरामपूर दिपक कदम- पाकिस्तानच्या ९ दहशतवादी केंद्रांवर भारताने ऑपरेशन सिंदुर करत बदला घेत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा जल्लोष भाजप नेते दिपक पटारे, शरद नवले, माजी नगरसेवक रवी पाटील, दीपक चव्हाण,मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या पुढाकाराने श्रीरामपूर भाजपने शहिद भगतसिंग चौकात साजरा केला.
प्रसंगी अभिषेक खंडागळे, महिला शहराध्यक्ष पुष्पलता हरदास, डॉ.शंकर मुठे, पूजा चव्हाण, दत्ता खेमनर, महेंद्र पटारे, दत्ता जाधव, रूपेश हरकल, भैय्या भिसे उपस्थित होते.यावेळी बोलताना पटारे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या तिन्ही सैन्य दलांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेत ऐतिहासिक कामगिरी केली असून संपूर्ण भारत देशात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. 

यावेळी शरद नवले म्हणाले की,पाकिस्तानच्या कारवायांना थेट प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने भारताची ताकद जगाला दाखवली आहे.केतन खोरे यांनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या घरात घुसून भारतीय वायूसेना, नौदल, लष्कराच्या संयुक्त कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याने संपूर्ण विश्वात भारताचे महत्त्व वाढले आहे. तर रवी पाटील यांनी भारताच्या दहशतविरोधी कारवाईमुळे १४० कोटी जनतेत आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले. दीपक चव्हाण यांनी पाकिस्तानचा भारताने बदला घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

यावेळी बैजु तांबडे, रवी पंडित, विशाल अंभोरे, राहुल पांढरे, आसिफ पोपटीया, अक्षदा आछाड, बाळासाहेब हरदास, किरण उईके, अशोक तायडे, निसू बेडेकर, बबलू यादव, विशाल रुपनर,मोहन अढांगळे, संदीप पटारे, उमेश बिडवे, सागर म्हस्के, कार्तिक मंडवे, तेजस उंडे, 

राजू झांजरी, संकेत पाटील, विशाल फटांगरे, सोमनाथ वराडे, विशाल ठाणगे, आकाश उमाप, रमेश यादव, तेजस गायकवाड, विशाल सुरडकर, मच्छिंद्र धोत्रे, योगेश व्यवहारे, सागर जाधव,सनी बारसे, किरण पठारे, प्रकाश सडमाके, पृथ्वी चव्हाण,उमेश पवार, शरद शिंदे, साजिद शेख, श्रेयस सुवर्णपाठकी, शुभम हरदास, पराग फोपळे, अमोल कांबळे, राजेंद्र चव्हाण, नवनाथ पवार, किरण सिंग टाक, चंदन सिंग जुनी, तुषार कोकरे, सचिन बिडलान आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!