संभाजीनगर सिटीलाईन न्यूज नेटवर्क
शहराजवळील वाळूंज एमआयडीसीमधील वडगाव-सागतपुरी रस्त्यावरीलवरील एका हॉटेलजवळ मध्यरात्री पोलिसांनी सापळा रचून एका सराईत गुन्हेगाराचा एन्काउंटर करून ठार केल्याने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.
अमोल खोलकर असे मृत आरोपीचे नाव असून तो उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी होता.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल खोतकर हा वाळूंज एमआयडीसीमध्ये काल रात्री एका हॉटेलमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने वडगाव साजापूर रोडवरील हॉटेल परिसरात रात्री साडेअकरा वाजता सापळा रचला ठरल्याप्रमाणे खोतकर त्या ठिकाणी दाखल झाला.मात्र, त्याला समोर पोलीस दिसल्यानंतर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात त्याचा एन्काऊंटर झाला.
या अचानक झालेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाला.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता,आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकिरण गवे यांनी गोळीबार केला.या गोळीबारात खोतकर गंभीर जखमी झाला आणि त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.अमोल खोतकर याच्यावर लड्डा दरोडा प्रकरणासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती.तो गेल्या काही महिन्यांपासून फरार होता आणि त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता.
दि. १५ मे रोजी मध्यरात्री २ ते ४ या वेळेत लड्डा यांच्या बंगल्यावर सहा दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला होता.यावेळी घरात झोपलेल्या लड्डा यांच्या बालकाचे तोंड चिकटपट्टीने आणि हात रुमालाने बांधण्यात आले होते.दरोडेखोरांनी त्यांच्या छातीवर पिस्तूल रोखून ५.५ किलो सोन्याचे
दागिने, सोन्याची बिस्किटे, ३२ किलो चांदीचे दागिने आणि ७० हजारांची रोख रक्रम असा एकूण लाखोंबा ऐकत लुटून नेला होता.विशेष म्हणजे, ही घटना एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर घडली होती.
दरम्यान, या प्रकरणी संशयित आरोपी अमोल खोतकर हा योगेश हसबे याच्याकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार काल रात्री सापळा रचण्यात आला.रात्री ११ वाजता खोलकर बहगाव-कोल्हाटी येथील हसबे यांच्या हटिलजवळ कार घेऊन आला.मात्र,पोलिसांना समोर पाहताय त्याने गोळी झाडली व कार वेगात चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एका पोलीस कर्मचा-याच्या पायावरून गाडी गेली.त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी किण गधे यांनी प्रति उतरा दाखल गोळीबार करत खोतकरचा एन्काऊंटर केला. त्याच्यासोबत असलेल्या एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.