नाशिक दिनकर गायकवाड कळवण तालुका दलित
शिक्षण प्रसारक मंडळ कार्यालय देवळा या संस्थेची सन २०२५-३० पंचवार्षिक निवडणूक होऊन संस्थेचे ज्येष्ठ सभासद कारभारी अहिरे यांची अध्यक्षपदी,तर कार्याध्यक्षपदी भाऊराव अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सन १९६० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या नोंदणीकृत असलेल्या संस्थेची संचालक मंडळाची निवड बिनविरोध करण्यात आली होती.
त्यानंतर नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. खालीलप्रमाणे पदाधिका-यांची निवडणूक बिनविरोध झाली.
अध्यक्षपदी कारभारी अहिरे, सरचिटणीसपदी एकनाथ जगताप, कार्याध्यक्षपदी भाऊराव तानाजी अहिरे, कोषाध्यक्षपदी बळवंत हिरे, उपाध्यक्षपदी पोपट गांगुर्डे व कैलास पवार, सहचिटणीसपदी अशोक पवार, हिशेब तपासनीसपदी दीपक जगताप, संचालकपदी दौलत अहिरे, केशव पवार, राजाराम केदारे, जालिंदर हिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.