उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
संगमनेर नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील
जनता शिक्षण प्रसारक मंडळ, चंदनापुरी संचलित
देवगड माध्यमिक विद्यालय,हिवरगाव पावसा शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाचा निकाल ९८.०० टक्के लागला आहे.ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा निर्धार करत,गेल्या काही वर्षांपासून सातत्याने यशाची शिडी चढत असलेल्या हिवरगाव विद्यालयाने या वर्षी देखील उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.यावर्षी शाळेतील एकूण ५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या यशामध्ये विद्यार्थ्यांच्या मेहनत,शिक्षकांचे मार्गदर्शन,पालकांचे सहकार्य व शाळेचे शिस्तबद्ध वातावरण महत्त्वाचे ठरले आहे.“यशाची परंपरा आमच्या शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे व विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केल्यामुळे शक्य झाले आहे.भविष्यात देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”असे मुख्याध्यापिका श्रीम.सुनंदा उगले यांनी सांगितले.
प्रथम क्रमांक कु.श्रवणी रविंद्र पावसे हिने पटकाविला असुन तिला ८७.४० टक्के गुण मिळाले तर व्दितीय क्रमांक सोनाली शरद पावसे हिने मिळविला तिला ८२.८० टक्के गुण आहेत तृतीय क्रमांक चि.निलेश अण्णासाहेब शिंदे याने प्राप्त केला आहे त्यास ८२.२० टक्के गुण आहेत तसेच साईराज विजय पावसे ८१.६०%,शिंदे श्रुती रामनाथ शिंदे ८१% यांच्या सह वैष्णवी पावसे,पूर्वा पावसे,नम्रता पावसे,दीक्षा भालेराव,समृद्धी सुशांत पावसे,सूरज पावसे,सार्थक कोटकर,समाधान गडाख,वैष्णवी पावसे,श्रद्धा पावसे,वर्पे ऋतुजा,कार्तिक पावसे,शेटे आर्यन,पांडे दिव्या,टेमगिरे आर्यन या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे.
एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत चमकदार यशाबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी,सरपंच,उपसरपंच
ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील,विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थ व पालक ,मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,आजी - माजी विद्यार्थी हिवरगाव पावसा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.