घुलेवाडीत सव्वादोन कोटीच्या विकास कामांचा आ. खताळ यांच्या हस्ते शुभारंभ होताच विरोधकांचा उठला पोटशूळ
संगमनेर संपत भोसले- संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांच्या माध्यमातून भरीव निधी आणू शकलो.या निधीतून विविध विकास कामे मार्गी लागत आहे त्यात घुलेवाडीत सव्वा दोन कोटीची विकास कामे सुरू होत आहे.ती सर्वकामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी.ठेकेदारांनी कामाचा दर्जा चांगला ठेवला तरच तुम्ही या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे करू शकतील.अन्यथा तुम्ही दुसऱ्या तालुक्यात कामे शोधण्याची सोय करून घ्या! अशी तंबी आमदार अमोल खताळ यांनी ठेकेदारांना दिला.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेतर्गत सव्वादोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आ.अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी बुद्ध विहार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी मंचावर शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे रिपाइंचे शहराध्यक्ष कैलास कासार अल्प संख्यांक सेनेचे तालुकाध्यक्ष मंजाबापू साळवे रवींद्र गिरी शिवसेना शाखा प्रमुख शरद पानसरे ज्येष्ठ मार्गदर्शक विनायक वाडेकर भाजप उपाध्यक्ष भिकाजी राऊत सिताराम पानसरे विलास राऊत कैलास काशीद,स्वरूप राऊत, संजय पानसरे रोशन कोथिंबीरे स्वप्निल राऊत,सुनील राऊत, सुरज राऊत, प्रशांत राऊत,सुनील पानसरे ,ओंकार राऊत,वैभव राऊत ,रवी दिवे ,विजय घुले ,ओंकार काळे ,आकाश पवार ,सागर पवार यांच्यासह पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता नाना अहिरे आणि घुलेवाडी ग्रामपंचायत अधिकारी रामदास दरेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.खताळ म्हणाले की घुलेवाडी ही आमचीच जहागीरदारी आहे असे काही जण समजत होते.त्यांनी कधीच वंचित समाज बांधवांच्या भागाचा विकास केला नाही. निवडणुका आल्या की मगच त्यांना विकास दिसतो इतरवेळी ते या समाज बांधवांचा फक्त निवडणुकी पुरता वापर करत असतात. मात्र आता कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांना धमक्याचे आणि दादागिरी चे फोन येतील परंतु त्यांच्या या दादागिरीला भीक घालू नका मी तुमच्या पाठीमागे भक्कम उभा आहे असाविश्वास व्यक्त करते म्हणाले की या तालुक्यातील दहशत व दादागिरी आपण मोडून काढत त्यांचा बंदोबस्त केला आहे . मात्र अजून त्यांचे काही बगलबच्चे राहिले आहे तुम्ही सर्वांनी मला साथ दिली तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त करू या मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ न देता विकास कामांच्या माध्यमा तून फुलेवाडी नव्हे तर संपूर्ण मतदार संघातील मूलभूत प्रश्न सोडले जातील.
राजकारण समाजासाठी असते धमक्यांना भिक घालु नका
-केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा आत्तापर्यंत सर्वांना लाभ मिळवून दिला आहे.मात्र जे काही या शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिले आहे. त्यांना ही महायुती सरकारच्या माध्यमातून लाभ दिला जाईल राजकारण हे विकास कामा साठी केले पाहिजे. परंतु आता जे काही कार्यक्रमाला आले त्यांना फोन करून धमक्या दिल्या जातील. मात्र त्यांच्या धमक्यांना कुठल्याही प्रकारची भीक घालू नका मी तुमच्या पाठीमागे भक्कम उभा आहे असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी घुलेवाडीकरांना दिला .
नातेवाईकांचे दवाखाने चालावे म्हणुन सरकारी दवाखान्याचा खेळखंडोबा
-घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात महायुती सरकारच्या माध्यमातून सोनो ग्राफी आणि डायलेसिस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इथून मागील काळात आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होते. मात्र आपल्या नातेवाई कांचे दवाखाने चालले पाहिजे म्हणूनच त्यांनी या तालुक्यातील ना आरोग्याचा आणि ना जनतेच्या विकासाचा प्रश्न सोडू शकले हे त्यांचे अपयश असल्याची टीका आमदार अमोल खताळ यांनी केली