सर्वच विषयात ३५ गुण पुढील शिक्षण घेणार-प्रिया मोरे
आश्वी संजय गायकवाड- मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी हंन्टर आयोगाकडे महात्मा ज्योतीराव फुले यांनी केली होती व छत्रपती शाहु महाराजांनी एक रुपया दंड ठेवला होता आणि आज शैक्षणिक कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून महत्वाची असलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना निकाल पाहून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तर,अनेकांना अपेक्षित यश न मिळाल्यामुळं अश्रू अनावर झाले. दुसरीकडं संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथील प्रिया किरण मोरे या विद्यार्थीनींनीने चक्क दहावीच्या सगळ्याच विषयात ३५ गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
प्रिया पास होईल का नाही? याची खात्री खुद वडीलांसह कोणालाच नव्हती. मात्र, दहावीच्या परिक्षेत ३५ टक्के मिळवून पास झाल्यानंतर प्रिया मोरे राहत असलेल्या रहिमपुर गावात आनंद साजरा झाला.शंभर पैकी शंभर गुण मिळवणे जेवढे अवघड त्यापेक्षा सर्व विषयात ३५ गुण मिळवणे म्हणजे दिव्यच पण हेच दिव्य.
तालुक्यातील रहिमपुर येथील भिमाजी आंबोजी शिंदे बिरोबा विद्यालयाती कु .प्रिया किरण शिंदे हिने सादय करत मराठी असो वा इंग्लिश किंवा गणित असो वा विज्ञान सर्व विषयात ३५ गुण मिळवु न परफेक्ट ३५ चा मान मिळवलाय दहावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले
रहीमपुर ग्रा.प.चे कर्मचारी असलेले किरण मोरे यांची जेष्ट कन्या प्रिया मोरे हिने दहावीची परीक्षा दिली होती व खुद् तिच्या वडीलानाच ती पास होईल कि नाही खात्री नव्हती मात्र ऑनलाईन निकाल हातात पडला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला मुलगी पास झाली
प्रियाला सर्व विषययांना ३५ मार्क ५०० पैकी १७५ गुण मिळाले आणि परिसराचे लक्ष प्रियाकडे वळले संगमनेर तालुक्यातील ती एकमेव म्हणावे लागेल सर्वांनी तिचे कौतुक करत अभिनंदन केले गावच्या वतीने संरपंच सौ. सविता लक्ष्मण शिंदे उपसरपंच राहुल गुळवे ग्रामसेवक किशोर मांढरे शांताराम शिंदे नाना शिंदेसह गावातील सर्वांनीच प्रिया मोरे व तिच्या कुंटुबाचा सत्कार केला तर भविष्यात मी खुप अभ्यास करत सर्व शिक्षण पुर्ण करणार असल्याचे प्रिया मोरेनी यावेळी सांगितले.