नाशिक प्नतिनिधी नाशिक ग्रामीण महावितरण विभागातील कार्यकारी अभियंता.राजाराम दामोदर डोंगरे हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले.त्यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
हा सोहळा मा. मंत्री, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडला त्यांनी श्री. डोंगरे यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला आणि त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.डोंगरे यांनी आपल्या सेवाकाळात विविध विभागांत उल्लेखनीय कामगिरी करून एक आदर्श अधिकारी म्हणून लौकिक मिळवला आहे, असे मत थोरात यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर,.डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी डोंगरे यांच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा करत त्यांचे अभिनंदन केले.