नागपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित भिमजयंती या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.या चित्रपटाची शुटींग वर्धा जिल्ह्यातील देवळी, वर्धा, सेलु, सांवगी (मेघे) येथे करण्यात आले असून जवळ पास ३० दिवसात चित्रपटाचे चित्रीकरण झाले. या चित्रपटामध्ये एक स्त्री आपल्या पतीला कशा प्रकारे चांगला मार्ग दाखवून व मार्गदर्शन करून एक डेव्हपर्स उद्योगपती कशाप्रकारे बनवते यांचे जीवंत उदाहरण या चित्रपटामध्ये आहे.हा चित्रपट स्त्रीप्रधान असून महान, सामाजिक पारीवारिक असा हा रंगीन चित्रपट आहे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आहे.
या चित्रपटामध्ये (चार) गाणी असून संगीतकार बाबा जागिरदार यांनी म्युझिक दिले आहे. गायक स्वप्नील बांदोडकर, रेश्मा सोनवणे, वैशाली सामंत, गायकवाड यांनी गाणी गायली असून याचे पोस्ट प्रोडक्शन शंकुतलम स्टुडीओ मुंबई
येथे झाले. चित्रपटाची शुटींग चालू असतांनी लोकेशन्स निवडणे व वेळेवरती काही बदल होत असल्यामुळे लोकेशन्स मिळवण्या करीता तारेवरची कसरतच झाली आहे. अनेक अडचणींना तोंड देवून मी हा चित्रपट पूर्ण केला व आज प्रदर्शनास सज्ज आहे. ३० मे २०२५ रोजी विदभार्तील सर्व जिल्ह्यांमध्ये चित्रपट प्रदर्शीत होत आहे. या चित्रपटाची निर्मिती उमेश क्रियेशनच्या बॅनरवरती होत असून लेखक निर्मात उमेश म्हसकर आहेत.
सहनिर्मिती म्हणून यशवंत भांडेकर, उज्वला भांडेकर, वर्षा म्हैसकर, संतोष मेंढेकर आहे यातील प्रमुख कलाकार हर्षवर्धन शिंदे,श्रेव्यानी काशीद, अजय राठोड, उमेश मौसकर, रिया पाटील, उत्कर्ष म्हैसकर, प्रशांत तोतला, कॅमेरार्मेन युवराज केळवदकर, ॲक्शन डॉयरेक्टर मोहम्मद अली. नृत्यदिग्दर्शक मंगेश देवके, कौसर शेख, गितकार संजय भन्साळ, ऑडीटर वीर प्रसाद, साऊंड डिझायनर चिन्मय परडा, सह दिग्दर्शक मुकुंद पगारे, नागपूरची कलाकार सीमा सपकाळ, उज्वला रोडगे, साधना रामटेके, अशोक गवळी, सुनिल हिरेखन, या कलाकारानी सुध्दा उत्कृष्ट भुमिका केली आहे.
मी या चित्रपटाचा दिग्दर्शक विलास गाडगे म्हणून सर्व प्रेक्षक जनतेला विनंती करतो आहे की हा चित्रपट सिनेमा गृहात जावून बघावा व भीमजयंती चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद द्यावा असे आवाहन दिग्दर्शक विलास गाडगे यांनी पत्रकार परिषदेत केले