नारायण बागडे यांचा संतप्त सवाल
नागपूर, सिटीलाईन न्यूज नेटवर्क विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी सावली सारख्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माता रमाई यांचे वरळी स्मशानभूमीत राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार की नाही,असा थेट सवाल आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सरकारला केला आहे.
येत्या २७ मे रोजी माता रमाई यांची पुण्यतिथी असून, त्या दिवशी तरी शासनाने स्मारकाची अधिकृत घोषणा करावी,अशी मागणी त्यांनी केली.अहिल्याबाई होळकर स्मारकासाठी निधी जाहीर करताना सरकारने मोठा गाजावाजा केला. त्याच धर्तीवर माता रमाई यांच्या स्मारकासाठीही निर्णय घेतला पाहिजे.गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चासह विविध संघटना स्मारकासाठी प्रयत्नशील आहेत.आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाकडून आंदोलनही करण्यात आले. परंतु,
आजही आराखडा तयार नाही. ही शोकांतिका असून याविरोधात २७ मे पासून राज्यव्यापी अभियान सुरू करण्यात येईल.त्याची सुरुवात वरळी स्मशानभूमीत माई रमाई यांना अभिवादन करून केली जाईल,असा इशारा बागडे यांनी दिला आहे.