संत भुमीच्या लेकरांना देवाचे अधिष्ठान
आश्वी संजय गायकवाड देव कालातीत आहे,काळ कोणताही असो त्याने काहीही फरक पडत नाही.श्रद्धा विश्वास भक्ती मार्गातील फार महत्त्वाच्या गोष्टी आहे देवाविषयी प्रेम असावे त्याने आपोआप श्रद्धा व विश्वास निर्माण होतो.
सोमवारी सांयकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान पावसाने रुद्र अवतार धारण केला होता वादळी वारे विजांचा कडकडाट सुरु होता माझा सर्व परिवार बंगल्याच्या हॉल मध्ये बसलेला होता त्याच वेळी एक मोठा आवाज झाला जो स्फोटासारखा होता कडकडाट भंयकर होता क्षणात आम्ही सर्व मरणार असे वाटले सर्व गर्भगळीत झाले बाहेर सर्वत्र हाहाकार उडाला होता यमदेव बंगल्याभोवती रुंजी घालत होता मात्र आयुष्य भर परमेश्वर आणि पंढरीच्या विठ्ठलाचे नित्य नियमाने मनोभावाने केलेले भजन पुजन आज माझ्या परिवाराच्या कामे आल्याची प्रतिक्रिया येथील विठ्ठल भक्त व त्यांच्या बंगल्यावर विज पडली व त्यातुन सुखरूप बचावलेले मांढरे कुटुंबाचे प्रमुख दिलीप मांढरे यांनी दिल्याने सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळत हर एक जण स्थिर गंभीर होताना दिसतोय.
सोमवारी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसात आश्वी खुर्द येथील विक्रम दिलीप मांढरे यांच्या घरावर वीज कोसळली सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही मात्र मांढरे परिवाराचे सुमारे पाच लाखाहुन अधिक भौतिक नुकसान झाले आहे.
वादळी वारा आणि पाऊस सुरु असतानाच विजांच्या कडकडाटात मांढरे यांच्या घरावर वीज कोसळली त्यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र हॉल मध्ये बसले होते तर घरा जवळच मोठ्या लिंबाच्या झाडाखाली सुमारे ३० फुट रुंद व १०० फुट लांब पत्र्याचा गोठा व त्यात २० गाई होत्या व घरावर सोलर पॅनल होते त्यावर विज पडली मोठा आवाज झाला डोळे झाकले व काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या.
आत्ता आपले काही खरे! नाही असे प्रत्येकाला वाटले सर्वांचा विठ्ठलाचा धावा सुरु होताच क्षणात डोळे उघडले व शेजारी कुठे तरी विज पडली म्हणुन बाहेर डोकावत असतानाच जिन्याने सौर पॅनलचे व घरातील विजेचे जळालेले बोर्ड थेट हॉल मध्ये जोरात येऊन पडले तेव्हा काळजात धस्स झाले, अन् खात्री झाली कि विज आपल्याच घरावर पडली कुटुंबातील सहा जण वीस गाई फक्त पांडुरगाच्या कृपेनेच वाचल्या आणि अचानक आनंद व दुःख अश्रु अनावर झाले वरच्या मजल्याच्या स्लॅबला दोन छिद्रे पडले जिन्याच्या लोखंडी ॲगल वितळले गेले संपूर्ण विद्युत यंत्रणा वायर बोर्ड ट्युब पंखा इन्वर्टर सर्व यंत्रणा जळुन खाक झाले रात्री जसजशी हि वार्ता गावात पसरली तेव्हा मोठ्या प्रमाणात मित्र नातलग घटनास्थळी आले आम्हाला धीर दिला असे श्री मांढरे माध्यमांशी बोलताना सांगत होते.
सकाळी महसुल पथकांने पंचनामा केला मात्र या कुंटुबाला अजुनही आपण सुरक्षित आहे याचा विश्वास बसत नाही व्यवसायाने शेतकरी असलेले हे कुटुंब दुध व्यवसायावर अवलंबून आहे तर दिलीप मांढरे हे स्वतः वारकरी असुन पंचक्रोशीत विठ्ठल भक्त म्हणून परिचित आहे गावातील काकडा हरिपाठ भजन किर्तन प्रवचन बारशे अंत्यविधी सर्व ठिकाणी सातत्याने भजनाला हजेरी लावून आपली सामाजिक बांधिलकी जपतात आज त्यांच्या विठ्ठल भक्तीने त्यांचा परिवार सुखरुप आहे अशी प्रतिक्रिया सर्व गावकरी देत आहे.
सोमवारी सांयकाळी झालेल्या या पावसाने येथील शेतकरी संपत मुरलीधर गायकवाड यांच्या रहात्या घराची भिंत पडली तसेच भवर वस्तीवर दत्त मंदिराजवळ निलेश बाळासाहेब भवर यांच्या नारळाच्या झाडावर विज पडली मात्र येथे कोणतीही जिवित अथवा वित्त हानी झाली नाही