ठाणे विशाल सावंत-ठाणे एसटी महामंडळाच्या ठाणे ते नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या 'स्मार्ट बस'मधील आयटी सुरक्षा प्रणालीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली.
परिवहन महामंडळाच्या या 'स्मार्ट बस'मध्ये प्रगत चालक सहाय्यक प्रणाली (एडीएएस)आणि चालक निरीक्षण केमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच ३६०° अंशातील सर्व माहिती चालकाला देणारे ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये प्रवासी भागात २, समोर आणि पाठीमागे प्रत्येकी १ कॅमेरा बसवण्यात आला आहे. तसेच चालक सहाय्यक स्क्रीन, मोबाईल जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी स्क्रीन आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे.