येवला प्नतिनिधी निफाड येथील माणुस्की फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जोतिबा फुले भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त समाजभूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते हा पुरस्कार नुकताच येवला येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पगारे यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो त्या अनुषंगाने येवला तालुक्यात महेंद्र पगारे यांनी गोर गरिब शोषित पीडित दुर्लक्षित तसेच शेतकरी शेतमजूर या सर्वाच्याच प्रश्नावर नेहमीच मोर्चा आंदोलनांच्या माध्यमातून भक्कमपणे
बाजू मांडत असतात तसेच निराधार महिला अंपग गरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून ते समाजसेवा करतात शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची वाटचाल असुन ते नेहमी महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करत मार्गदर्शन करतात तसेच संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शहरातील व तालुक्यातील सर्व लोकांना बरोबर घेऊन सुख दुःखात सहभागी होऊन एकमेकांना आधार देतात तर अनुकटे सावखेडे गावाने त्यांना बिनविरोध निवडून अध्यक्ष केलेले आहे आतापर्यंत महेंद्र पगारे यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यात भिख्खू संघाचा अनाथ पिंडक पुरस्कार कोल्हापूर येथे राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे
प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
शरद शेजवळ यांच्या क्रांतिकारी गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली
हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री व येवला तालुक्याचे आमदार छगन भुजबळ,माणुसकी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर निकाळे जेष्ठ नेते शिवाजी ढेपले निफाड उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन समाजभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महेंद्र पगारे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या तसेच येवला तालुक्यातील जेष्ठ नेते माणिक शिंदे व माजी नगराध्यक्षा उषा माणिक शिंदे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मिडीयावर महेंद्र पगारे याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे
यावेळेस स्वारीपचे विजय घोडेराव स्वारीपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आहीरे जेष्ठ नेते सुरेश खळे युवा तालुकाध्यक्ष मयुर सोनवणे राजेंद्र आहेर रिपाइंचे सागर गायकवाड संजय गायकवाड बौध्दाचार्य वाय.डी. लोखंडे समाजसेवक दादाभाऊ काऊटकर याच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुहास सुरेलकर यांनी केले तर आभार दिंगबर वडघुले यांनी मानले