नाशिक दिनकर गायकवाड घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये किमतीचे दागिने घरफोडी करून चोरून नेल्याचा प्रकार पंचवटीत घडला.
फिर्यादी ज्योती संजीव पाटील (रा.साईशिवनगर, रासबिहारी लिंक रोड, नाशिक) यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा कडी व कुलूप अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. यावेळी घरातील कपाटात असलेले २५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल व २५ हजार रुपये किमतीचे पूर सोन्याचे वेल असे ५० हजार रुपयांचे दागिने घरफोडी करून चोरून नेले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलीस हवालदार ठाकरे अधिक तपास करीत आहेत.