श्रीरामपूर दिपक कदम माजी खा.डॉ.सुजय विखे पा. यांच्या अथक प्रयत्नातून व डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित प्रधानमंत्री दिव्याशा केन्द्र, अहिल्यानगर यांचे कडून आसान दिव्यांग संघटनेचे संस्थापक.संजय साळवे यांच्या विशेष प्रयत्नातून श्रीरामपू चे दिव्यांग.जगदीश पाटील यांना वयोश्री व दिव्यांग योजने अंतर्गत मोफत बॅटरी वरील सायकल नुकतीच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक डॉ.दिपक अनाप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
जगदीश पाटील हा दिव्यांग अतिशय मेहनती व कष्टाळू. बेलापूर रोडला हातगाडी वर व्यवसाय करून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.अपंग सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष संजय साळवे यांच्या नजरेत जगदीशची धडपड लक्षात आली आणि तातडीने प्रयत्न सुरु केले.आणि त्या प्रयत्नांचा आनंद जगदीशच्या चेहऱ्यावर विलसत आहे.
डॉ सुजय दादा विखे यांनी तातडीने मागणी पूर्ण केली आणि दिव्यांग जगदीशला नवी आशा नवी दिशा मिळाली सहायक साधनांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीचे जीवन सुखकर व आनंदी बनवल्याबद्दल डॉ. सुजय विखे यांचे अपंग सामाजिक विकास संस्थाचे सचिव वर्षा गायकवाड व आसान दिव्यांग संघटना पदाधिकारी यांनी विशेष आभार मानले.