नगरचे माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनाने जिल्ह्यात पसरली शोककळा.

Cityline Media
0
पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन

संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव 
अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे दोन पंचवार्षिक आमदार राहिलेले अरुण काका बलभीम जगताप यांचे आज मध्य रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.ते ६७ वर्षांचे होते.या वृत्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
अरुण काका जगताप यांचे पार्थिव राहत्या घरी सारसनगर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.मागील काही दिवसांपासून पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते.तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते.मा.आ.अरुण जगताप यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यात खाजगी रुग्णालयात दाखल केले.

अरुण जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका नावाने परिचित होते.त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती,मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप,माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप,सुना, नातवंडे असा परिवार आहे.भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे ते व्याही होते.अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली.युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.अहमदनगर महानगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते.तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते.अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!