येवला प्नतिनिधी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त तालुक्यातील अनुकटे येथे विविध कार्यकारी संस्थेत ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या हस्ते झाले यावेळी श्री.पगारे म्हणाले की एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करतांना त्यासाठी संघर्ष करुन बलिदान देणाऱ्या शुरवीर क्रांतीकारकांच्या स्मृतीला अभिवादन केले पाहिजे.
पुढे बोलताना श्री पगारे म्हणाले की मोठ्या संघर्षमय चळवळीतून १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्यांची स्थापना झाली तर देशातील कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कायदामंत्री असताना कामगारांसाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेऊन कायदे तयार केले व एक मे च्या दिवशी एका कामगाराचा कामावर कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्याने त्यांच्या स्मृती म्हणून कामगार दिन साजरा करण्यात येतो.
यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष संपत मोरे सरपंच सुनिता गायकवाड उपसरपंच भिमराज गायकवाड मा.उपसरपंच गौतम पगारे संस्थेचे संचालक अरुण पवार मनोहर गायकवाड सुदाम गायकवाड,कैलास गायकवाड, गणेश वाघ,अरुण दाणे सचिव सौ.निर्भवणे शिक्षक श्री.दराडे.श्री भाटे श्री.व्यापारे.श्री.जोशी.श्री.जाधव सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते