श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर संगमनेर रोड ओम किराणा शॉपिंग मॉल समोर भाजपाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर तसेच श्रीरामपूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे श्रीरामपूर शहराध्यक्ष जितेंद्र छाजड मर्चंट असोसिएशनच्या वतीने मर्चंट चे अध्यक्ष गौतम उपाध्ये संचालक पुरुषोत्तम झंवर योगेश ओझा श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या हस्ते शाल बुके तसेच फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
त्यावेळी दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले की नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर श्रीरामपूरची जबाबदारी आहे आपण सत्तेत आहात मध्यंतरी श्रीरामपूर नगरपालिकेने श्रीरामपुरातील अतिक्रमाने काढून बऱ्याच दुकानदारांना विस्थापित केलेआहे .
त्या दुकानदारांचं पुनर्वसन करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांनी शब्द दिला आहे तशा श्रीरामपूर नगरपालिकेने हालचाली देखील चालू केल्या आहे परंतु पुनर्वसन होण्यास बराच कालावधी लागणार आहे त्यामुळे विस्थापित दुकानदारांची तात्पर्य
स्वरूपात त्यांचा रोजी रोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करावेत कारण आपण सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असून आपण श्रीरामपूरचा देणं लागतो त्यामुळे विस्थापितांचे पुनर्वसन करावे ही तुमची जबाबदारी आहे असेही त्रिभुवन म्हणाले त्यावेळी
मर्चंट असोसिएशनचे संचालक पुरुषोत्तम झंवर संचालक योगेश ओझा श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष अशोक उपाध्ये आदींनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी मर्चंट असोसिएशनचे संचालक प्रवीण गुलाटी गणेश राठी बाळासाहेब निलेश बोरावके संजय कासलीवाल बाळासाहेब खाबिया प्रवीण कोठावळे बाळासाहेब कासलीवाल राहुल सराफ राहुल उपाध्ये अतुल उपाध्ये तुषार दुगड सिद्धार्थ उपाध्ये देवेंद्र उपाध्ये प्रसाद चौधरी धीरज गुजर अविनाश उपाध्ये आदी उपस्थित होते सूत्रसंचालन मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी केले तर आभार योगेश ओझा यांनी मानले