बाल,युवांना धम्म संस्कारित करणे हि धम्म कुटूंब संस्थांची नैतिक जबाबदारी-महेद्र पगारे

Cityline Media
0
बाल-युवांना धम्म संस्कारित करणे ही धम्म,कुटुंबसंस्थांची नैतिक जबाबदारी : महेंद्र पगारे

येवला (प्नतिनिधी) माणूस पहिला की धर्म हा प्रश्न कायम अनुत्तरित असला तरी धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म याचा उकल झाला असून मानवी मन-कृतीतील प्रज्ञा,शील,करुणा, ममता,दया,क्षमा,शांती हाच मानवाचा खरा धर्म आहे.बाल-युवा वयापासून मानवी समता,स्वातंत्र्य, न्याय,बंधुता,धर्मनिरपेक्षता,मानवता हि मूल्य नव्या पिढीत रुजवणे गरज असून बाल-युवांना धम्म संस्कारित करणे ही धम्म,कुटुंबसंस्थांची नैतिक जबाबदारी असल्याचे उदगार सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पगारे यांनी काढले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या धम्म संस्कार प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था,नाशिक यांच्या माध्यमातून ऐतिहासिक येवला मुक्तीभूमी येथे सुरू असलेला रविवारची धम्मशाळा-संडे धम्म स्कुल उपक्रम हि काळाची गरज आहे,बाल-युवा  धम्म संस्कार केंद्रात धम्म उपासक-उपसिकांनी आपल्या कुटूंबातील बालक-युवकांना नियमितपणे पाठवावे.

धम्म चळवळ गतीमान करणे हि काळाची गरज असल्याचे पगारे म्हणाले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.एस.डी.शेजवळ यांनी प्रास्ताविक केले.संयोजक धम्ममित्र प्रा.गजानन सुर्येकर,इंजि.अक्षय गरुड यांनी संडे धम्म स्कुल व बाल-युवा धम्म संस्कार प्रशिक्षण दिले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.एस.डी. शेजवळ, ॲड.चंद्रकांत निकम,पप्पू बनसोडे,साखरचंद बनसोडे उपस्थित होते.नेत्रा सुर्येकर,लिलाबाई दुसिंगे,
सुबोध  बनसोडे,शिवराज अहिरे,तृप्ती रुखे,मानसी बनसोडे,सम्राट रुखे,अनुष्का  बनसोडे,जयश्री नेटारे,रोशन अहिरे,सार्थक पगारे,कुणाल वाघ,रोहित वाघ इ.बालक-युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन ॲड.चंद्रकांत निकम व इंजि.अक्षय गरुड, आभार प्रा.गजानन सुर्येकर यांनी मानले.

आपले धम्म उपासक बंधू 
प्रा.गजानन सुर्यकर
धम्म प्रचारक/प्रशिक्षक
94031 15713
अक्षय गरुड
70206 89160
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!