देवगड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ‌शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल कामगिरी

Cityline Media
0


विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार‎

संगमनेर नितीनचंद्र भालेराव संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत
विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांनी पात्रता मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार‎ करण्यात आला.त्याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा उगले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले,आमच्या विद्यार्थ्यांनी जिद्द,चिकाटी आणि सातत्याने मेहनत करत हे यश संपादन केले आहे.शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व पालकांचा सातत्यपूर्ण पाठिंबा देखील या यशामागील महत्त्वाचा भाग आहे.भविष्यात आमचे विद्यार्थी राज्यस्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करतील,असा आम्हाला विश्वास आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिवन्या योगेश पावसे,ऋतुराज संतोष पावसे,वैष्णवी भगवान शिर्के,जय विजय पावसे,आर्या लहानु भालेराव,प्रगती संदीप पावसे,रणदीप संतोष शिरसाठ आणि मोहम्मद उमर मन्सूर इनामदार या विद्यार्थ्यांनी शाळेतील नियमित सराव परीक्षा,कठोर अभ्यास व शिक्षकांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन यांच्या आधारावर हे यश संपादन केले आहे.

शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या विशेष उपक्रमांचा आणि अतिरिक्त सराव सत्रांचा यामध्ये मोठा वाटा आहे.शिक्षक माने मदन यांनी विद्यार्थ्यांना मराठी,थोरात दिनेश यांनी गणित व बुद्धिमत्ता, वर्पे सविता यांनी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले.देवगड विद्यालयाने या आधीही विविध शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने यश मिळवले आहे.
यंदाचे यश हे विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीचे व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित आहे,असे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा उगले यांनी सांगितले.

जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,देवगड देवस्थानाचे अध्यक्ष गणपत पावसे,सेवानिवृत्त 
मुख्याध्यापक रमेश पावसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.विद्यार्थ्यांनी 
परीक्षेत दाखवलेली गुणवत्ता व मेहनत कौतुकास्पद आहे. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका,
शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी,संस्थेचे पदाधिकारी या सर्वांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

भविष्यात अशाच प्रकारे उज्ज्वल यश संपादन करून विद्यालयाचे आणि पालकांचे नाव मोठे करावे अशा शुभेच्छा हिवरगाव पावसा ग्रामस्थ व पंचक्रोशीतून देत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!