भारतातल्या ऑपरेशन सिंन्दूर नंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला एक दोन नव्हे तर भारताच्या लष्कराच्या १५ ठिकाणांवर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
जम्मू,पूच्छ मधील मित्र मैत्रिणींच्या संपर्कात आहे.काल रात्री त्यांच्याशी फोनवर बोलत असताना सायरनचे आवाज, शिलिंगचे आवाज ऐकले आहेत. युद्ध परिस्थिती काय असते हे आपल्यापेक्षा ते लोक अधिक जाणतात. दहा दिवस पुरेल इतका किराणा आणि भाजीपाला घेऊन काही मित्र मंडळी चिल्ल्यापिल्यांना घेऊन बंकरमध्ये गेलेत. पुढे काय होणार याबद्दल कुणालाही कल्पना नाही. किराणा दुकान, पेट्रोल पंप बंद आहेत. या युद्ध कहाण्या ऐकायला गोड वाटतात, सोसायला कठीण असतात. तुमचं कुणी जवळचं युद्धभूमीच्या आसपास असेल तर तुम्ही हे सगळं समजू शकता. सेवा दलातील काही साथी युद्धभूमीतल्या नागरिकांना सिव्हिल डिफेन्स ट्रेनिंग देत आहेत. त्यांचे अनुभव हृदय पिळवटून
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना भारतीय सैन्याने अपरिहार्यता म्हणून उत्तर दिले आहे. भारतीय सैन्यात आपलीच भावंड आहेत. घरदार सोडून देशसंरक्षणासाठी ते सीमेवर आहेत. त्यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव आम्हाला बघायचे नाहीत. आमच्या मित्रमंडळींची घरेदारे बेचिराख झालेली आम्हांला बघायची नाहीत.
या युद्धात दोन्ही देशाचे सामान्य नागरिक मारले जाणार आहेत. सुखवस्तू कुटुंबातील लोक कॅमेरासमोर टाचा उंचावून 'याचना नहीं अब रण होगा' या कविता म्हणतायेत. साम टीव्ही बलुचिस्तानमधील एका लग्नाचा व्हिडीओ शेयर करत तिथले लोक आनंदी आहेत अशी फेक बातमी दाखवत आहेत. एनडी टि.व्ही तर गाझा हल्ल्याचे दृश्य दाखवत आहेत. नैतिकेतला, विवेकबुद्धीला भारतीय माध्यमांनी तिलांजली दिली आहे.
रील स्टार्स आणि टीव्ही अँकर्स यांचे घरातले कुणी सीमेवर नाहीत, त्यांना केवळ युद्धाची भीषणता सेलिब्रेट करायची आहे. खरे तर युद्धाच्या गोष्टी सामान्य नागरिकांच्या हाती नसतात. किमान यावेळी तरी आपण आपली विवेकबुद्धी जागृत ठेवूया.एकमेकांना आधार देऊया. फेक न्यूज रोखुया. शांतीसाठी प्रार्थना करूया. युद्धाचं सेलिब्रेशन थांबवुया. जबाबदार नागरिक बनुया.
सागर भालेराव
मुक्त पत्रकार
