अहिल्यानगर मध्ये द पॉवर ऑफ व्हॉइसचा समारोप उत्साहात

Cityline Media
0


अहिल्यानगर : येथील आयएमएस सीडसी तर्फे आयोजित 'द पॉवर ऑफ व्हॉइस आवाजाच्या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी या चार दिवसीय कार्यशाळेचा यशस्वी समारोप झाला.या समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास संशोधक भूषण देशमुख आणि आयएमएस चे माजी सरसंचालक डॉ. शरद कोलते यांची उपस्थिती लाभली.
आयएमएस डेप्युटी डायरेक्टर डॉ विक्रम बार्नबस, समन्वयक डॉ. ऋचा तांदूळवाडकर आणि या कार्यशाळेच्या मुख्य मार्गदर्शक निवेदिका वीणा दिघे आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कोलते म्हणाले, आपल्यातील क्षमता ओळखायला शिका आणि त्यावर अभ्यासपूर्वक कौशल्य विकसित करा. आजच्या स्पर्धेच्या युगात हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

देशमुख यांनी मनुष्याला जन्मजात काहीतरी कौशल्य देवाने दिलेले आहे त्याचे संवर्धन करून त्याचा व्यावसायिक प्रगतीसाठी कसा उपायोग करून घेता येईल याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी टेक

कॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी आणि कृष्णा बेलगावकर उपस्थित होते.

या समारोप सत्राचे सूत्रसंचालन, पाहुण्यांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन कार्यशाळेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांनीच अत्यंत उत्साहाने पार पाडले. त्यांनी आपल्या अनुभव कथनातून या कार्यशाळेने त्यांच्या आत्मविश्वासात व संवादकौशल्यात कसा सकारात्मक बदल घडवला हे मनोगतातून व्यक्त केले. वीणा दिघे यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनाखाली माईक कसा धरावा या छोट्याशा पण प्रमुख गोष्टीपासून ते वाणीचे प्रकार, संवाद कौशल्य, प्रभावी बोलणे,

व्यक्तिमत्व विकास आणि आवाज नियंत्रण या महत्त्वाच्या पैलूंवर सखोल प्रशिक्षण या चार दिवसांत देण्यात आले.

कार्यक्रमाचे सुरुवातीचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी सत्यम लुनिया व मरियम सय्यद यांनी केले. तनिष्का सोरटूरकर हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रशस्तीपत्र वाटप वाचन प्रदीप तांदळे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. सुप्रिया सापा आणि प्रणव रामदिन यांनी केले. कार्यक्रमाची संपूर्ण तांत्रिक बाजू सोहम सौंदणकर याने सांभाळली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनही सादर केले. त्याचे निवेदन सुहासिनी डांगे यांनी केले. यामध्ये पल्लवी शिंगी,

अमृता कवडे आणि वैष्णवी मुटकुळे यांनी आपली कला सादर केली. निलेश पठारे, प्रमिला डोके, सोनाली साळुंके आणि मालती बर्डे यांनी यावेळी या कार्यशाळेचे अनुभव कथन केले.

आयएमएस सीडसी तर्फे अशा कार्यशाळांची मालिका भविष्यातही राबवली जाणार असल्याचे समन्व्यक डॉ. ऋचा तांदूळवाडकर यांनी यावेळी सांगितले.

पुढील बॅचची नाव नोंदणी चालू झाली असून अधिक माहिती साठी व नावानोंदणी साठी ९८५०३७०१४१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!