नाशिक दिनकर गायकवाड लग्राचे आमिष दाखवून
तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करून तिच्या भावाच्या बुलेटसह चारचाकी वाहनाया अपहार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फियांदी तरुणीची शादी डॉट कॉम या साईटवर आरोपी मुस्तफा खान याच्याशी ओळख झाली.तेव्हापासून आजपर्यंत खान याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून,तसेच तरुणीचा होणारा पती आहे,असे भासवून पीडितेला
पंडित कॉलनी,सातपूर, तसेच वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन पीडितेचा नकार असताना देखील तिला भुलवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याधार केले.आरोपीने तिचा विश्वास संपादन करून अप्रामाणिकपणे फिर्यादीच्या भावाच्या नावावर बुलेट मोटारसायकल, तसेच होंडा सिटी कार घ्यावयास भाग पाहून फिर्यादीच्या ताब्यातून स्वतःच्या ताब्यात घेऊन दोन्ही वाहनांचा अपहार केला या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात मुस्तफा खान याच्याविरुद्ध बलात्कारासह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.