संदीप फाउंडेशन अंतर्गत होणार अनंत कान्हेरे मैदानाची देखभाल

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड -येथील संदीप फाउंडेशनच्या सीएसआर अंतर्गत शहरातील हुतात्मा अनंत कान्हरे मैदानाची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे महापालिकेच्या ५० लाखांची बचत होणार आहे.
महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून हुतात्या अनंत कान्हेरे मैदानाचे सुशोभीकरण कराम्यात आले आहे. कान्हेरे मैदानावरील जॉगिंग ट्रॅक व संरक्षक भिंतीचे नूतनीकरण प्रवेशद्वार,सायकल ट्रॅक,क्लॉक टॉवर, पॅव्हेलियन इमारतीची दुरुस्ती, क्रिकेट मैदानाभोवती माऊंटेड लॅण्डस्केपिंग पिण्याच्या कामावर जवळपास १२ कोटींचा खर्च आला आहे.

या मैदानात सकाळ आणि सायंकाळी शहरातील नागरिक व्यायामासाठी येत असतात. त्यामुळे या नागरिकांसाठी या मैदानावर विविध स्वरुपाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मैदानाकडे मनपाचे दुर्लक्ष झाल्याने या ठिकाणी टवाळखोरांचा उपद्रव

वाढला आहे. रात्रीच्या वेळी चोरांकडून प्रवेश करून या ठिकाणच्या साहित्याची तोडफोड केली जाते. या ठिकाणच्या वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाणही वाढले आहे.मद्यपी देखील या ठिकाणी प्रवेश करत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अनेक प्रकारच्या अनेक तक्रारीनंतर आमदार देवयानी फरांदे यांनी मैदान सीएसआर अंतर्गत चालविण्यास देण्याची किंवा ठेकेदारामार्फत चालविण्याची सूचना

केली होती.त्यानंतर महापालिकेने सदरचे मैदान ठेकेदारामार्फत देखभाल दुरुस्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती.

मात्र,नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त खत्री यांनी या मैदानाची देखभाल दुरुस्ती करण्याचा निर्णय येत त्याषी जबाबदारी संदीप फाउंडेशनवर सोपविण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्री.बागुल यांनी दिली.त्यामुळे मनपाची ५० लाख उपयांची बचत होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!