नाशिक दिनकर गायकवाड- घरातील मंडळी बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात बोरट्याने शेतातील शेडमध्ये ठेवलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या सोयाबीनच्या गोण्या चोरून नेल्याची घटना महसरूळ येथे नुकतीच घडली.
फिर्यादी संजय हरिभाऊ सानप या जुना नाका म्हसरूळ हे नातेवाईकांकडे नांदगाव येथे हळदीच्या कार्यक्रमाला कुटूबांसह गेले होते त्यांनी शेडमध्ये ठेवलेल्या ३० किलो वजनाच्या प्लास्टिकच्या गोण्यांत सोयाबीन ठेवली होती.ही संधी साधून अज्ञात घोरट्याने त्यांच्या शेतातील घरासमोर असलेल्या दीड लाख रुपये किमतीचे सोयाबिन चोरून नेले.
या प्रकरणी म्हसरूळपोलीस ठाण्यात बोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार वसावे करीत आहेत.