प्रशासनाला अध्यादेशाची प्रतीक्षा :प्रभाग रचनेकडे लक्ष
नाशिक दिनकर गायकवाड निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रभाग रचनेबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.त्यामुळे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकांसाठी अध्यादेश जारी केला जाण्णार आहे
नाशिक महापालिकेतही निवडणूक कक्ष सज्ज झाला असून माजी नगरसेवक इच्छुकामध्ये उत्साह पहायला मिळत आहे.सर्वोच्च न्यायालयाने राज्य
शासनाला चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळेत व्हाव्यात.यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहे. नाशिक महापालिकेत निवडणूक कक्ष सज्ज असून शासनाकडून निर्णय येताच प्रभाग रचनेच्या कामाला सुरूवात केली जाईल.
राज्य निवडणूक आयोगाकडून कामाबाबत सूचना मिळताच महापालिका प्रशासनाकडून मतदारयाद्या निश्चित केल्या जातील.यासोबतच प्रभाग रचनेवरही काम केले जाईल. कोरोनामुळे जनगणना रखडली होती.त्यामुळे शहरातील लोकसंख्या चार ते पाच लाखांनी वाढल्याचा अंदाज आहे.
सन २०१७ च्या निवडणुकीवेळी एका प्रभागासाठी तीस ते बत्तीस हजारांची लोकसंख्या निश्चित करण्यात आली.मात्र,आता प्रभागासह सदस्यसंख्या वाढवणार असल्याचे बोलले जात आहे. याकडे सर्वपक्षीयांचे लक्ष लागले आहे.